सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

कामतीत अल्लाउद्दीन बाबा उरुसाची जय्यत तयारी; 7-8 मे रोजी भक्तिभावाचा उत्सव…

मोहोळ तालुक्यातील कामती बु. येथे अल्लाउद्दीन बाबा उरुस ७ व ८ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार असून गावात सध्या तयारीचा माहोल रंगला आहे. बौद्ध पौर्णिमेनंतर येणाऱ्या गुरुवार-शुक्रवारी हा उरुस भरविण्याची परंपरा असून, यंदाही भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे…

अल्लाउद्दीन बाबा हे हिंदू व मुस्लीम बांधवांचे समान श्रद्धास्थान मानले जात असल्याने या उरुसाला विशेष महत्त्व आहे. सर्वधर्मीय ऐक्याचे प्रतीक ठरलेला हा उत्सव दरवर्षी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडतो.

उरुसाच्या पहिल्या दिवशी, ७ मे रोजी गावातून पारंपरिक संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात निघणाऱ्या या मिरवणुकीत परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.

८ मे रोजी कामती गावची यात्रा भरविण्यात येणार असून विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. यावेळी गावात उत्सवी वातावरण निर्माण होऊन भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.

उरुसानिमित्त १० मे रोजी जंगी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून दुपारी २ ते ४ या वेळेत कुस्त्यांचे सामने रंगणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन यात्रा समितीचे अध्यक्ष अफसर मुजावर, सचिव समीर मुजावर आणि नामदेव खराडे वस्ताद यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia