सोलापूर बातमीsolapurpoliceमहाराष्ट्र

बेपत्ता मुलीचा शोध लागत नसल्याने नातेवाईकांचे चक्क मंद्रूप पोलीस ठाण्यासमोर उपोषण; पोलीस ठाण्याचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर : अधीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी

दक्षिण सोलापूर तालुका मधील मंद्रूप येथील इंदिरानगर परिसरातील एका अल्पवयीन मुलीचा मागील १५ ते २० दिवसांपासून काहीच पत्ता लागलेला नसल्यामुळे मंद्रूप परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी संबंधित कुटुंबीयांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही मुलीचा शोध घेण्यात पोलीस मंद्रूप पोलिसांना अद्याप यश प्राप्त झालेले नाही त्याच बरोबर मंद्रूप पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून थेट मंद्रूप पोलीस ठाण्याच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण करून बेपत्ता मुलीचा शोध घेण्यास मंद्रूप पोलिसांचा अपयश आल्याच्या निषेधार्थ संतप्त नातेवाईकांनी मंद्रूप पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले असून, “आमच्या मुलीचा तातडीने शोध लावा” अशी मागणी त्यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना नातेवाईकांनी सांगितले की, मुलगी बेपत्ता झाल्यापासून अनेक वेळा मंद्रूप पोलिस ठाण्यात हेलपाटे मारून वारंवार विनंती व संपर्क साधून ही ठोस माहिती मिळत नसल्याने आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. “पोलीस प्रशासनाने तत्काळ शोधमोहीम राबवून आमच्या मुलीचा शोध लावावा,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्येही मंद्रूप पोलिसांबाबत नाराजी व्यक्त होत असून, पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia