जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरमहाराष्ट्रसोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

जन आरोग्य योजनेशी अंगीकृत रुग्णालयाची एक ही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

योजनेविषयी अधिक माहिती- जाणून घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक 155388/18002332200 आणि 14555/1800111565 या क्रमांकावर संपर्क साधावा

सोलापूर, दिनांक 20:- जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे अंगीकृत असलेले शासकीय व खाजगी असे 123 रुग्णालये आहेत. या सर्व रुग्णालयांनी शासन निर्देशाप्रमाणे अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी निशुल्क व गुणवत्तापूर्ण आरोग्य उपचार करणे आवश्यक आहे. तरी या सर्व रुग्णालयाबाबत रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांच्याकडून उपचार, शुल्क व वैद्यकीय हलगर्जीपणा या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची एकही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या आढावा प्रसंगी जिल्हाधिकारी कार्तिकेयन बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवार, जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ, नगरपालिकेचे जिल्हा प्रशासन अधिकारी योगेश डोके यांच्यासह योजनेचे अंगीकृत शासकीय व खाजगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, प्रतिनिधी तसेच जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत कुंभार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले की, या योजनेअंतर्गत शासनाकडून प्रति कुटुंब पाच लाख रुपये प्रतिवर्षी आरोग्य संरक्षण मिळणार आहे. या अंतर्गत 27 विशेष सेवा अंतर्गत 2399 आरोग्य उपचार उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यामुळे अंगीकृत रुग्णालयांनी त्यांच्याकडे रुग्ण आरोग्य सेवेसाठी दाखल झाल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ तात्काळ उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत रुग्णालयाबाबत रुग्णांच्या तक्रारी होताच कामा नयेत, अशी काळजी रुग्णालयानी घेणे आवश्यक आहे. तसेच आपण स्वतः जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयात अचानकपणे भेट देणार असून या कालावधीत या योजनेअंतर्गत रुग्णांना व्यवस्थित उपचार न देणाऱ्या रुग्णालयावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
या सर्व रुग्णालयात दर्शनी भागात योजनेविषयीच्या बोर्ड लावावा तसेच टोल फ्री क्रमांक ही लावावा. आरोग्य यंत्रणेने 123 अधिकृत रुग्णालयापैकी 95 ठिकाणी आरोग्यमित्र उपलब्ध केले आहेत, उर्वरित 28 ठिकाणीही तात्काळ आरोग्य मित्र नियुक्त करावेत. या योजनेत चांगले काम करणाऱ्या रुग्णालयांचे कौतुक असून रुग्णालयाच्याही काही अडचणी असतील त्याही सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत च लाभार्थ्यांचे रेशन कार्डही वेळोवेळी अपडेट झाले पाहिजे असेही त्यांनी सूचित केले.
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून या योजनेअंतर्गत प्रतिदिन दहा हजार कार्ड काढण्याचे नियोजन करावे. आपल्या जिल्ह्यात कार्ड काढण्याचे प्रमाण कमी असून त्याच्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली पाहिजे. ही योजना मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांच्या प्राधान्य क्रम असलेली योजना आहे. त्यामुळे या योजनेत सोलापूर जिल्हा ही अग्रेसर राहिला पाहिजे, या दृष्टीने आरोग्य यंत्रणा यांनी नियोजन करावे. नगरपालिका क्षेत्रात लाभार्थ्यांची कार्ड काढण्यासाठी जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका यांनी सहकार्य करावे. तसेच जिल्ह्यातील आशा सेविकांनी कार्ड काढण्याच्या कामात सहकार्य करावे यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत आश सेविकांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डोईफोडे यांनी सर्व अंगीकृत रुग्णालयांनी त्यांच्याकडे आलेले लाभार्थी रुग्णांना या योजनेत बसवावे. त्यांना चांगले उपचार करावे व रुग्णालयाची तक्रार होणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगितले. यावेळी श्री कुंभार यांनी या योजनेअंतर्गत सर्व माहिती ग्रामीण स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार प्रसिद्धी करावे तसेच रुग्णालयाची यादी व आजारांची यादी मराठी मध्ये उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच काही रुग्णालयांनी त्यांना या योजना राबवताना येणाऱ्या अडचणीची माहिती दिली.
प्रारंभी जिल्हा समन्वयक श्री. गुंजाळ यांनी योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने पोर्टलवर फेब्रुवारी मध्ये शिफ्ट झाल्याचे सांगितले. त्याप्रमाणे जिल्ह्यात आठ लाख 73 हजार 167 कुटुंबे असून एकूण लाभार्थी संख्या 40 लाख 91 हजार 996 इतकी असल्याचे सांगून आज रोजी पर्यंत पंधरा लाख 75 हजार 399 इतके ई कार्ड जनरेट केल्याची माहिती दिली. वय वंदना योजनेअंतर्गत सत्तर वर्षांपुढील नागरिकांचे 20 हजार 987 ही कार्ड जनरेट केल्यास असून एकूण लाभार्थी संख्या दोन लाख 54 हजार 602 असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login