सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

सोलापुरात वॉटर पार्कमध्ये खेळताना 10 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू…

हृदय हेलावून टाकणारी, डोळ्यात अश्रू आणणारी एक अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे. आनंदाच्या एका क्षणात मृत्यूने आपला काळा सावळा पसरला. सोलापूर शहरातील शावर अँड टॉवर वॉटर पार्कमध्ये दुपारी कुटुंबासह गेलेल्या अवघ्या दहा वर्षांच्या निरागस चिमुकलीचा अचानक चक्कर येऊन दुर्दैवी मृत्यू झाला.

आज दिनांक १९ मे २०२६ रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मुस्लिम पाच्छा पेठेतील रहिवासी इकरा गौस भागनगरी (वय १० वर्ष) ही आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत आनंदाने वॉटर पार्कमध्ये खेळत होती. हसणारी, खेळणारी, किलबिलाट करणारी ही छोटी परी अचानक चक्कर येऊन जागीच बेशुद्ध पडली.

कुटुंबातील सर्वजण हैराण झाले. तिला तात्काळ श्री मार्कंडे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याची वेदनादायी घोषणा केली. एका छोट्याशा जीवाने जग सोडले आणि कुटुंबावर दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळला.

आई-वडिलांसमोरच आपली लाडकी मुलगी डोळ्यांसमोरून निघून गेल्याचे पाहणे हे कोणत्याही पालकासाठी अकल्पनीय यातना आहे. मृत्यूनंतर आई वारंवार रडत-रडत म्हणत होती,
“माझी मुलगी कुठे आहे? मला तिला बघायचे आहे… माझी इकरा कुठे आहे?”

नातेवाईकांनी सुरुवातीला शवविच्छेदनाला विरोध दर्शवला, मात्र नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालयात पाठवण्यात आला..
ही घटना ऐकून संपूर्ण परिसरात हळहळले व्यक्त होत आहे.

एक निरागस बालकाचा असा अकस्मात मृत्यू पाहून प्रत्येकाचं मन दुःखाने भरून जाते…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel