सोलापूर बातमीमहाराष्ट्र

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत यांनी मंगळवारी मुंबईतील मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत विविध पत्रकारांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खिलबुडे, पत्रकार महेश हणमे आदी उपस्थित होते.

या भेटीत पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे, ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शन संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा, सोलापूर श्रमिक पत्रकार गृह निर्माण प्रकल्पातील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी बैठक आयोजित करावी तसेच माध्यम व्यवसायातील अनुभव प्राध्यापक पदासाठी ग्राह्य धरण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत शासन पत्रकारांच्या विकासासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम सोबत असल्याचा विश्वास दिला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login