सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

सिव्हिल हॉस्पिटलमधील खड्ड्यांविरोधात संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन; स्टेचरवर झोपून प्रशासनाचे वेधले लक्ष

सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) परिसरातील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रुग्णांना होणाऱ्या त्रासाच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने अनोखे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले यांनी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात स्टेचरवर झोपून आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. रुग्णांना खड्ड्यांमधून नेताना होणारा त्रास शासन आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आले.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून तसेच राज्यातील विविध भागांतून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. यामध्ये गरीब, गरजू नागरिक, वीटभट्टी कामगार, बांधकाम कामगार, जेकॉब कामगार, मिल कामगार यांसह सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

रुग्णांना उपचारासाठी एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन तसेच इतर वैद्यकीय तपासण्यांसाठी एका विभागातून दुसऱ्या विभागात हलवावे लागते. मात्र, हॉस्पिटल परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे.

या खराब रस्त्यांमुळे स्ट्रेचरवरून नेण्यात येणाऱ्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः गंभीर रुग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती आणि प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना याचा मोठा फटका बसत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला.

पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे रुग्णवाहिका आणि इतर वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. एखाद्या रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी सिव्हिल प्रशासनाची असेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला.

संभाजी ब्रिगेडने प्रशासनाकडे सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नवीन सी.सी. रस्ते तयार करण्याची मागणी केली आहे. रुग्णांसाठी असलेल्या रुग्णालय परिसरातच अशा प्रकारची परिस्थिती असणे दुर्दैवी असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

या आंदोलनावेळी संभाजी ब्रिगेडचे माजी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, धाराशिव जिल्हाध्यक्ष शरद पडवळ, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, माजी शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष विक्रम वानकर, उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे, जिल्हा संघटक विशाल, जिल्हा संघटक दिलीप भोसले, शहर सचिव सतीश वावरे, पंकज बहादुले, आसिफ हकीम, सतीश रंगारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia