सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक
सोलापुरात हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी जमियात उलमा आली धावून…

सोलापूर येथील विजापूर नाका येथे राहणारे परमेश्वर दुधाळ वय वर्ष 40 या इसमाचे आज जमीयत ये उलमा च्या मदतीने अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे .
या इसमावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आला. मयत दुधाळ हे गेल्या काही दिवसापासून शहरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते अखेर त्यांनी आज शेवटचा श्वास घेतलाय..
सदरची माहिती रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांना देण्यात आली.. बाबांनी तत्काळ जविद कोलंपल्ली यांना पाठून दिले.
हिंदू इसमाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतल्याने बाबा मिस्त्री व त्यांची टीम तसेच जमियत उलमाचे सामाजिक जाणिवेतून केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे