सोलापूर बातमीमहाराष्ट्र

सोलापुरात सामाजिक बांधिलकीचा आदर्श; युवा उद्योजकाच्या वाढदिवशी 925 रक्तदात्यांचा सहभाग…

सोलापूर शहरातील युवा उद्योजक सुयश खानापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिनांक २४ मे २०२६ रोजी कन्ना चौक येथे पार पडलेल्या या सामाजिक उपक्रमात तब्बल ९२५ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
यश डेव्हलपर्स अँड कॉन्ट्रक्शन कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. वाढदिवस साजरा करण्याची वेगळी आणि समाजोपयोगी संकल्पना राबवत सुयश खानापुरे यांनी अनेक युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
सकाळपासूनच कन्ना चौक परिसरात रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. युवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. “रक्तदान हेच जीवनदान” हा संदेश देत अनेकांनी प्रथमच रक्तदान केले.
रक्तदान शिबिरासाठी शहरातील विविध रक्तपेढ्यांचे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवक यांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. रक्तदात्यांची तपासणी, नोंदणी आणि आरोग्याची काळजी घेत संपूर्ण शिबिराचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले.
यावेळी बोलताना आयोजकांनी सांगितले की, वाढदिवस हा केवळ केक कापून किंवा उत्सव साजरा करण्यापुरता मर्यादित न ठेवता समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अपघातग्रस्त, गंभीर रुग्ण आणि गरजूंसाठी रक्ताची आवश्यकता भासते. अशा वेळी हे रक्तदान अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी उपयोगी पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुयश खानापुरे यांच्या या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत असून अनेक सामाजिक संघटना व नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. युवकांनी अशा सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा आणि समाजासाठी योगदान द्यावे, असा सकारात्मक संदेश या रक्तदान शिबिरातून देण्यात आला.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी यश डेव्हलपर्स अँड कॉन्ट्रक्शन कंपनीचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे आणि सामाजिक बांधिलकीचे वातावरण पाहायला मिळाले…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login