शैक्षणिकसोलापूर बातमी

सोलापूर -विविध रंगांची उधळण करुन विद्यार्थ्यांनी काढल्या एकापेक्षाएक चित्रे….

सोलापूर – श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संघमच्या वतीने रंगपंचमीचे औचित्य साधून ५ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी ‘यंदा रस्त्यावर नव्हे तर, कागदांवर किंवा कपड्यांवर रंगाची उधळून करुयात’ अशी अनोख्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. सदरच्या स्पर्धेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत जवळपास २५० पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना पाच विषय देण्यात आले होते. वेगवेगळे विषय घेऊन विद्यार्थ्यांनी काढल्या एकापेक्षाएक चित्रे. याचे परिक्षण स्मिता हरिप्रसाद बंडी यांनी केल्या. विद्यानिकेतन प्रशालेतील १० वीचा विद्यार्थी दीपक अनिल चड्डे याने प्रथम क्रमांक मिळवला. प्रिसीजन इंग्लिश मेडियम स्कूलमधील ७ वीचा विद्यार्थी तेजस चक्रधर अन्नलदास याने द्वितीय क्रमांक पटकावला. तर, तृतीय क्रमांक डी. आर. इंग्लिश मिडीयमच्या ७ वी मधील विद्यार्थी चिन्मय हिराचंद बोडा याने जिंकला.

उत्तेजनार्थ बक्षीसे : उमाबाई श्रविका विद्यालयातील ७ वीच्या विद्यार्थ्यींनी आरुषी महेश कोळी हिने उत्तेजनार्थ पुरस्कार मिळविले. वीरतपस्वी इंग्लिश स्कूलच्या ९ वीच्या अंशुमन श्रीनिवास संगा ह्या विद्यार्थ्यांने उत्तेजनार्थ बक्षीस पटकावला. भू. म. पुल्ली कन्या प्रशालेतील ९ वी मधील गौरी औदुंबर जक्कन ह्या विद्यार्थ्यांनीने उत्तेजनार्थ पुरस्कार मिळवली. या स्पर्धेचे प्रायोजक असलेल्या अंबादास पेंटप्पा कट्टा, दामोदर दिगंबर पासकंटी यांच्या वतीने बक्षीसे देण्यात आले आणि विजेत्या व सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना ‘प्रमाणपत्र’ सरगम टी ॲन्ड कोल्ड्रींक्स – (चाय पे चर्चा) यांच्याकडून देण्यात आले होते. ज्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळाले नाही अशांनी 9021551431 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावेत. यावेळी स्पर्धेचे पारितोषिके दामोदर पासकंटी व सखी संघमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी यांच्या हस्ते देण्यात आले. सोबत फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, किशोर व्यंकटगिरी, श्रीनिवास पोटाबत्ती, वैकुंठम् जडल, बालाजी कुंटला यांच्यासह आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सखी संघमच्या समन्वयिका कला चन्नापट्टण यांनी केल्या.

फोटो ओळ : श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघम तर्फे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी विजेत्या विद्यार्थी सोबत दामोदर पासकंटी, फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, किशोर व्यंकटगिरी, श्रीनिवास पोटाबत्ती, वैकुंठम् जडल आणि सखी संघमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी, समन्वयिका कला चन्नापट्टण आदी दिसत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
Account Suspended
Account Suspended
This Account has been suspended.
Contact your hosting provider for more information.