सोलापूर राजकीय

सोलापूर MIM मध्ये ताळमेळ नाही , MIM पदाधिकारी यांचा गौप्यस्फोटाने चर्चेला उधाण….

सोलापूर ( प्रतिनीधी ):- संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धाम धूम सुरू असताना अनेक पक्षांनी आपापले उमेदवार देऊन निवडणुकीत सहभागी होत निवडणुकीला सामोरे जात असतांना सोलापुरात मात्र ऐन निवडणुकीत MiM मध्ये कोणतेच ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे. सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी देण्यावरून MIM पक्षात जोरदार राडा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या 4 दिवसापासून सोलापूर लोकसभा निवडणुकीत MiM पक्ष सुद्धा निवडणूक रिंगणात उतरणार आणि मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना उमेदवारी देणार अशी चर्चा होत असताना mim पक्षाचे सरचिटणीस असणारे कोमारू सय्यद यांनी नाराजी व्यक्त करीत पक्षातील काही लोक चुकीचे कामकाज करून पक्षाला अडचणीत आणत आहे, रमेश कदम यांना उमेदवारी मागायची असेल तर त्यांनी पक्ष कार्यालयात येऊन मागणी करणे गरजेचे असताना पक्षातील लोक त्यांना जाऊन भेटणे हे कित पत योग्य आहे, पक्ष मोठा की व्यक्ती असा सवाल कोमारु सय्यद विचारला आहे. एमआयएम’च्या हैदराबादेतील नेत्यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत कल्पनाच नाही. त्यांच्या परस्पर काही लोक माजी आमदार रमेश कदम यांना भेटायला गेले. त्यांच्या परस्परच उमेदवारी देण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप ‘एमआयएम’चे सरचिटणीस कोमारूह सय्यद यांनी केला आहे.

कोमारू सय्यद पुढे म्हणाले की , एमआयएमची पहिली लढाई भाजपविरुध्द आहे. अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात न्याय व हक्कांसाठी आम्ही भांडत आहोत. भाजपला मदत होईल, असे कृत्य mim पक्षाकडून होणार नाही.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याचा निर्णय पक्षीय पातळीवर झालेला नाही. मी गेले दोन दिवस पक्षाचे जिल्हा निरीक्षक अन्वर सादात यांच्या संपर्कात आहे.

या नेत्यांनीही सोलापुरात उमेदवार देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. पक्षाचे काही माजी नगरसेवक दोन दिवसांपूर्वी माजी आमदार रमेश कदम यांना भेटायला गेले होते.

पक्षाकडून कुणाला उमेदवारी हवी असेल, तर त्यांनी पक्ष कार्यालयात येणे अपेक्षित असते. आमचे लोक परस्पर त्यांना भेटायला गेले.

भाजपला मदत होईल, अशी कृती पक्षाच्या शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांना मान्य नाही, असेही त्यांनी सांगितले. ‘एमआयएम’मधील या घडामोडींवर मात्र काँग्रेस आणि भाजपचे नेते लक्ष ठेवून आहेत . सोलापूर Mim पक्षाने आता तरी याचा विचार करावा लागेल अशी रोखठोक भूमिका कोमारू सय्यद यांनी मांडली आहे…

सोलापूर Mim पक्षाचे सरचिटणीस असणारे कोमारू सय्यद यांच्या अनेक प्रश्नामुळे MiM शहर अध्यक्ष फारूक शाब्दी यांची डोके दुखी वाढणार आहे. कारण आता mim पक्षात सुद्धा इतर पक्षा प्रमाणे दोन गट पडणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे. आता पाहु या पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष फारूक शाबदी काय निर्णय घेणार हे पाहणे आता जरुरीचे आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel