सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर महानगरपालिकासोलापूर सामाजिक

महापालिकेतर्फे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा….

फडकुले सभागृह येथे निबंध लेखन, सुंदर हस्ताअक्षर, मराठी शुधलेखन स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण....

सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली फडकुले सभागृह येथे आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी केले. मराठी गौरव भाषा दिनाबद्दल कवी लेखक कुसुमाग्रज यांच्या बद्दल माहिती सांगितली, जगातील बोलणाऱ्या भाषा पैकी मराठी भाषा पंधराव्या व भारतात चौथ्या क्रमांकावर असं प्रास्ताविकामध्ये उपायुक्त तैमूर मुलाणी म्हणाले. अक्षर मित्र अभिजित भाडंगे यांनी दररोज वीस ते पंचवीस ओळी लिहावेत त्यामुळे आपले सर्वांचे हस्ताक्षर सुंदर होण्यास मदत होते. सुंदर हस्ताक्षर संदर्भात तसेच चारोळी व कवितेतून मराठी भाषा किती समृद्ध आहे याबद्दल माहिती दिली.त्यानंतर श्रीधर खेडगीकर यांनी वाचन चळवळ चालू करायची वेळ का आली याबद्दल माहिती दिली. सोलापूर मधील मारुती चितमपल्ली यांनी मराठी भाषेला एक लाख शब्द दिले. नितीन वैद्य, अच्युत गोडबोले, अपूर्वा जोशी यांची पुस्तके वाचावेत.अशा अनेक वाचनीय लेखन संदर्भातील त्यांनी मार्गदर्शन केलं.यावेळी अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. मुलांना याबद्दल पुस्तक उपलब्ध करून दिली पाहिजे मराठी भाषेचा इतिहास अभ्यास करणे आवश्यक आहे. मराठी भाषा समृद्ध केली पाहिजे. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि माणसाच्या लिखाणामधून माणसाचे स्वभाव कळतो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचण्याची आवड निर्माण करावी तसेच विद्यार्थ्यांनी सन,उत्सव यावर शुभेच्छा देण्यासाठी टपाल, अंतरदेशीय कार्डवर शुभेच्छा देण्यासाठी प्रवृत्त करावे. सोलापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने 63 शाळा मध्ये निबंध लेखन, सुंदर हस्ताक्षर, मराठी शुद्धलेखन, इंग्रजी शब्दाची मराठी अनुवाद स्पर्धेचे आयोजन केले होते. या मध्ये एकूण 1000 विद्यार्थीनी सहभाग नोंदवला. त्याचे बक्षीस वितरण आज मान्यवरांचे हस्ते फडकुले सभागृह येथे विद्यार्थी यांना प्रमाण पत्र देऊन करण्यात आले. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,अतिरिक्त आयुक्त रवि पवार, उपायुक्त तैमूर मुलाणी, मुख्यलेखा परीक्षक रुपाली कोळी, वक्ते अभिजित भडंगे,वक्ते श्रीधर खेडगीकर, सहा. आयुक्त गिरीश पंडित, मनीषा मगर, नगर अभियंता सारिका अक्कूलवार, कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, संतोष बुलबूले, मलिनाथ हिरेमठ, महेश वालवलकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेन्हा पुजारी यांनी केले तर आभार सहा. आयुक्त गिरीश पंडित यांनी केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia