सोलापूर बातमीखेळमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

सन 2025 च्या आयपीएल स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट खेळाडू तसेच नानावलेले अंपायर श्री . अनिस सहस्त्रबुद्धे यांची अंपायर म्हणून निवड झाली आहे.

सन 2025 च्या आयपीएल स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट खेळाडू तसेच नानावलेले अंपायर श्री . अनिस सहस्त्रबुद्धे यांची अंपायर म्हणून निवड झाली आहे.
त्यासाठी आज दिनांक 11 मार्च 2025 रोजी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयात जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे जेष्ठ सदस्य व माजी सचिव श्री दिलीप बच्चुवार यांच्या हस्ते श्री अनिस सहस्त्रबुद्धे यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश भुतडा यांनी केले. अत्यंत कमी वयात श्री अनिस सहस्त्रबुद्धे यांनी क्रिकेट अंपायर मध्ये फार उत्कृष्ट कामगिरी करून आयपीएल स्पर्धेसाठी स्वतःची निवड सार्थ करून दाखवली आहे भविष्यात वन डे क्रिकेट तसेच कसोटी क्रिकेट मध्ये सुद्धा ते नक्कीच अंपायर म्हणून कामगिरी करतील असा विश्वास सर्व उपस्थित खेळाडूंनी व्यक्त केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होते.
श्री चंद्रकांत रेंबरसो सचिव, श्री सुनील मालप , श्री राजेंद्र गोटे, श्री संतोष बडवे, श्री संजय वडजे, श्री संजय मोरे, श्री शिवानंद अकलूजकर, श्री किशोर बोरामणी, श्री सत्यजित जाधव, श्री चिराग शहा, श्री संकेत शहा, श्री सुखद जमादार, सौ किरण मनियार, जिल्हा खेळाडू कुमारी साक्षी वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia