मनोरंजन

प्रहारचे अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर मोठे आंदोलन….

भारतातील पहिल्या दिव्यांग मंत्रालयाचे निर्माते, वंदनीय बच्चू भाऊ कडू यांनी मोझरी अमरावती गुरूकुंज या ठिकाणी ८ जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करीत आहेत… गेल्या सहा दिवसांपासून करीत असलेल्या आंदोलनातील प्रमुख १७ मागण्या पैकी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात यावी, दिव्यांग, विधवा निराधार महिला यांना महिना ६००० रूपये पेन्शन वाढ करण्यात यावे, बेमुदत अन्नत्याग आंदोलनास महाराष्ट्रातून लाखो गोरगरीब, दिव्यांग, शेतकरी शेतमजूर या सहभागी होत आहेत…तरी शासनाने आंदोलनाची दखल तात्काळ घ्यावी. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन, प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलने करण्यात येतं आहेत… आज अक्कलकोट प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीने वंदनीय बच्चू भाऊ कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची तात्काळ शासनाने दखल घेऊन मागण्या मान्य कराव्या यासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ बस स्थानक व नवीन तहसील कार्यालयावर तहसीलदार यांना निवेदन देऊन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री पत्राद्वारे कळविण्यात यावे अशा आशयाचे निवेदन देऊन धरणे निषेध आंदोलन करण्यात आले… यावेळी तालुक्यातील दिव्यांग बांधव, विधवा महिला, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

508 Insufficient Resource

The website is temporarily unable to service your request as it exceeded resouce limit. Please try again later.