SOLAPUR SUICIDE : एकाच स्कार्फनं तरुण-तरुणीचा ग-ळ-फा-स, चिठ्ठीत भाऊ-बहीण असल्याचा केला उल्लेख…

काल आमच्या सोबत होती, आता कुठं गेली अश्विनीला घरात लाडाने स्वाती म्हणत होते. तिचे नातेवाईक हे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर रडत होते. काल आमच्या सोबत स्वाती बोलत बसली होती. आता तू कुठं गेली म्हणत आईने हंबरडा फोडला…
स्कार्फन्च्या साहाय्याने स्लॅब हुकाला तरुण-तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहित ठणकेदार (वय २३, रा. शांतीनगर, माही वस्ती), अश्विनी विरेश केलापुरे (२३, रा. शिरूर, बागलकोट) अशी त्यांची नावे आहेत ही घटना कर्णिकनगर येथे गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यात ‘आम्ही दोघे बहीण-भाऊ आहोत’, आई मुलगा आहोत. त्यामुळे आत्महत्येनंतर आमच्यावर शंका घेऊ नका’ असा उल्लेख आहे. ही बिठी मुलीने लिहिल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रोहित हा चालक म्हणून काम करत होता. तो बुधवारी कामावर गेला होता. गुरुवारी सकाळी तो मालकाची दुचाकी घेऊन गेला. सायंकाळपर्यंत न आल्याने मालकाने आपल्या कर्णिकनगर येथील घराकडे आल्यानंतर पहिल्या मजल्यावरील उपद्रवा रूममध्ये दोघे लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. मृत अश्विनीचे फार्मसीचे शिक्षण झाले होते. ती काही दिठसांपासून मामाकडे बागलकोट येवे राहण्यास गेली होती. बुधवारी ती सोलापुरात कागदपत्रे नेण्यासाठी आली होती. गुरुवारी सकाळी पुन्हा बागलकोटला जाते असे सांगून ती निघून गेली, पण ती मामाकडे गेलीच नाही. यामुळे तिचा शोध आई-वडील घेत होते.
भाऊ आहे म्हणून ओळख करून दिली रोहितच्या लग्नाविषयी शंकाच रोहित हा अस्थिनीच्या घरी येत होता. तेव्हा अश्विनीला तिच्या कुटुंबियानी विचारल्यावर तिने माझा भाऊ आहे. अशी ओळख करून दिली होती. तो आठवग्रधाभरापूर्वीच घरात येऊन गेला, अशी माहिती अश्विनीचे काका सिध्दलिग केसापुरे यांनी दिली. दरम्यान, तिने लिहिलेल्या दौडपानी चिड्डीत ‘भी गेल्यावर तुम्ही खुश व्हाल असाही उल्लेख केला होता. मृत रोहित हा गाडे यांच्या गाडीवर चालक महणून काम करत होता. रोहितचे लग्न झालेले असून असून त्याला एक मुलगा असल्याचे गाढ़े याने पोलिसांना सांगितले. त्याउलट त्याचे लग्नच झाले नसल्याचे स्पष्टीकरण त्याच्या आई वडिलांनी आणि मित्रांनी दिले….
कर्णिक नगरातील याच घरामध्ये रोहित, अम्धिनीने एकत्र गळफास घेतला. अश्विनीचा मृतदेह सिव्हिलमध्ये आणल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी आक्रोश केला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह एकाच वेळी शवविच्छेदनासाठी नेत असताना नातेवाईक जोरजोरात रडत होते. दरम्यान, तिचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून, यात तिच्या मामाचे जवळपास तीस मिसकॉल असल्याची माहिती सूत्रांनी दिली….



