सोलापूर बातमी

सोलापूरातील पत्रकार अल्ताफ शेख यांनी सोलापूरचा झेंडा सातारा मध्ये रोवला….

LOKप्रधान न्युज नेटवर्कच्या यशाला नवे पंख
लोकप्रधान न्युज नेटवर्कचे पत्रकार अल्ताफ शेख यांना राष्ट्रीय समाज भुषण पुरस्कार

सातारा : सोलापूर शहरातील लोक प्रधान या निर्भीड news चॅनलचे पत्रकार अल्ताफ शेख यांनी गेल्या काही वर्षात आपल्या पत्रकारितेचा ठसा शहर भर उमटविलेला आहे. अल्ताफ शेख हे अत्यंत उत्कृष्ट पत्रकारिता करून अनेक विषयांना वाचा फोडून अनेकांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी यशस्वी भूमिका बजावली आहे… लोक प्रधान न्यूज या नेटवर्कमध्ये कार्यरत असताना अल्ताफ शेख यांनी भरीव कामगिरी केली असल्याने त्यांचा सातारा येथे गौरव करून त्यांना पुरस्कार देण्यात आले….
महालक्ष्मी आधार फाउंडेशन साताराच्या वतीने भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुकास्पद कार्य करणाऱ्या कार्यवीरांचा राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात सामान्य माणसाच्या हक्काचा व्यासपीठ असणार दैनिक लोकप्रधान व LOKप्रधान न्युज नेटवर्कचे पत्रकार अल्ताफ एम शेख यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. प्रतिभा शेलार, सातारा जिल्हा कारागृहाचे पोलीस अधिक्षक श्री. शमाकांत शेडगे, सातारा सत्र न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सयाजीराव घाडगे, संयुक्त सचिव वंदना संकपाळ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांचा राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आल्याने त्यांना विविध स्तरातून शुभेच्छा देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा पुरस्कार वितरण सोहळा सातारामधील राजवाडा येथील नगरवाचनालय पाठक हॉल याठिकाणी पार पाडला. या कार्यक्रमासाठी महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. प्रतिभाताई शेलार, सातारा जिल्हा कारागृहाचे पोलीस अधिक्षक श्री. शमाकांत शेडगे, सातारा सत्र न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सयाजीराव घाडगे, संयुक्त सचिव वंदना संकपाळ मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login