सोलापूर महानगरपालिका
सोलापुरात पावसाने हाहाकार – भारत नगरात घरांसह विडी कारखान्यांत पाणी शिरले, लाखोंचे नुकसान

सोलापूर | भारत नगरातील संभाजी शिंदे स्कूलच्या पाठीमागील जुना वेडी घरकुल परिसरात काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे लोकांचे संसार विस्कळीत झाले आहेत. रात्रभर पावसामुळे घराघरांत पाणी शिरून धान्य, कपडे, फर्निचर पाण्याखाली गेले.
याच परिसरात असलेले छोटे छोटे विडी कारखानेही पाण्याखाली गेले असून लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. कच्चा माल, तयार माल आणि मशिनरी सर्वत्र पाण्यात बुडाल्याने शेकडो कामगारांचे रोजगार धोक्यात आले आहेत.
नागरिकांनी सांगितले की, “रात्रभर जागून पाणी काढत होतो, पण तरीही संसार उध्वस्त झाला. आता कारखान्याचे नुकसान झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्नही उभा राहिला आहे.”
प्रशासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली असून परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.



