सोलापूर बातमीखेळमहाराष्ट्रशैक्षणिक

लेखक संजय दुधाणे यांचा शिरवळ जि.प शाळेत सत्कार…

क्रीडा लेखकाच्या भेटीने भारावले विद्यार्थी...

सोलापूर: पुस्तकातील धड्यामधील लेखकाच्या प्रत्यक्ष भेटीने दक्षिण सोलापूरमधील शिरवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी भारावून गेल्याचे चित्र आज दिसून आले.

जागतिक पुस्तक दिनानिमित्त शिरवळ शाळेने लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 6 इयत्तेच्या मराठी पाठ्यपुस्तकातील लेखक संजय दुधाणे यांनी विद्यार्थ्यांची थेट संवाद साधून ऑलिम्पिकचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिरवळचे सरपंच शरणप्पा गौडनवरू यांच्या हस्ते संजय दुधाणे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच बसवराज पाटील. पंचपा शावळ, हणमंत हसाळे, रेवनसिद्ध पाटील, शिवानंद पाटील,
चंद्राम जनगोंडे, राजकुमार कुसगले, विजयकुमार कुसगले, मुख्याध्यापक रमेश माशाळे, मल्लिनाथ पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव या पाठाचे लेखक असणाऱ्या संजय दुधाणे यांनी खाशाबांच्या ऑलिम्पिक यशाला उजाळा दिला. खाशाबांनी ऑलिम्पिकमध्ये देशासाठी जिंकलेले पहिले पदक आजही प्रेरणदायी आहे असे सांगून दुधाणे पुढे म्हणाले की, खाशाबांना पद्मविभूषण पुरस्कार अद्याप न मिळणे ही देशाची शोकांतिका आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर तरी खाशाबांना पद्म पुरस्कार देऊन त्यांच्या अभूतपूर्व कार्याचा गौरव केला पाहिजे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel