सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या पाल्यांना सोनाई फाउंडेशनकडून शालेय साहित्य वाटप…

सोनाई फाउंडेशनचे संस्थापक- अध्यक्ष युवराज राठोड यांचे सुपुत्र आयुश याच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या पत्रकार पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिध्द म्हेत्रे होते.
यावेळी व्यासपीठावर सोनाई फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष युवराज राठोड, मंद्रूपचे पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, सरपंच अनिता कोरे, उद्योजक मिथुन मुगळे,आयुश राठोड,
दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी‌,काशीनाथ भतगुणकी, प्रदीप सुरवसे, ज्येष्ठ पत्रकार अमोगसिध्द लांडगे, रज्जाक बागवान आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित ५४ पत्रकार पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
प्रारंभी,आयुश युवराज राठोड याचा आठवा वाढदिवस केक कापून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

यावेळी माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे म्हणाले, युवराज राठोड यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे
विद्यार्थ्यांनी कष्ट आणि जिद्दीने अभ्यास करून जीवनात उज्वल यश मिळवावेत असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक राज डांगे म्हणाले, पत्रकार हा दिवस-रात्र काम करून समाजाचे प्रश्न मांडत असतात मात्र स्वतःच्या प्रश्नाकडे तो नेहमीच दुर्लक्ष करतो.युवराज राठोड यांनी पत्रकार पाल्याचे उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे त्यांचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे. दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी हे नेहमीच जनतेचे प्रश्न तसेच पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात.

यावेळी युवराज राठोड म्हणाले,
जनतेच्या आणि पत्रकार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत आगामी काळातही आपण सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक मध्ये संघटनेचे अध्यक्ष स्वामी यांनी संघटनेचा कार्याचा आढावा घेत युवराज राठोड यांच्या कार्याचे कौतुक केले यापुढील काळातही राठोड यांचे सहकार्य असेच लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभू पुजारी यांनी केले तर आभार पत्रकार नित्यानंद वारे यांनी मानले.
यावेळी या कार्यक्रमास पत्रकार बबलू शेख,समीर शेख, दिनकर नारायणकर,बालाजी वाघे,प्रमोद जवळकोटे, अशोक सोनकंटले, गुरू गायकवाड,अप्पू देशमुख,गिरमल्ल गुरव, बनसिध्द देशमुख, अभिजीत जवळकोटे, महेश पवार,राहुल उड्डाणशिव,आरिफ नदाफ, गजानन काळे, आनंद बिराजदार, शिवराज मुगळे, शिवय्या स्वामी,महासिध्द साळवे, महावीर रणखांबे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel