सोलापूर : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश तस्करीतील 86 आरोपींवर कारवाई ; चौघांना शहरातून हद्दपार…

बकरी ईद-2026 च्या अनुषंगाने सोलापूर पोलिसांनी मागील एका वर्षात गोवंश हत्या, तस्करी व वाहतूक प्रकरणातील 86 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यातील चार आरोपींना शहरातून 8 दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर यांनी दिलेल्या प्रेस नोटनुसार, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरात दाखल गुन्ह्यांतील 86 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापैकी चार आरोपींना भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 163 (2) प्रमाणे 8 दिवसांकरिता शहर हद्दीतून बाहेर केले आहे.
तसेच नमूद गुन्ह्यातील दोन आरोपींनी बंधपत्राचे उल्लंघन केल्याने त्यापैकी एका आरोपीची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर अन्य एका आरोपीकडून 25,000 रुपये दंड आकारून तो शासन जमा करण्यात आला आहे.
ही कारवाई पोउपनि, वाचक अधिकारी विक्रम रजपूत, पोउपआ परिमंडळ कार्यालय, सोलापूर शहर यांनी कळवली आहे.



