सोलापूर : घर घेण्यासाठी माहेरून पैसे आण, नोकरी करून पैसे दे; विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ…

शेळगी येथील विवाहितेचा घर घेण्यासाठी पैसे आणण्याची मागणी करत पतीसह सासरच्या चौघांनी शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे प्रकरण?
फिर्यादी गायत्री प्रणव आमले, रा. 2 बी योगीनाथ हौसिंग सोसायटी, शेळगी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 13/03/2023 पासून आजतागायत सासरी त्यांचा छळ सुरू होता.
आरोपी कोण?
1) प्रणव – पती
2) दिपक – सासरे
3) सुवर्णा – सासू
4) पल्लवी हुबळळी – नणंद, सर्व रा. सहजानंद सोसायटी जवळ, कोथरूड, पुणे
छळाचे स्वरूप
आरोपींनी मिळून फिर्यादी गायत्री आमले यांच्याकडे घर घेण्यासाठी पैशाची मागणी केली. तसेच नोकरी करून पैसे आणून दे असे म्हणून तिला सतत त्रास दिला.
फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण करण्यात आली. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास देऊन दमदाटी करण्यात आली.
गुन्हा दाखल
जोडभावी पेठ पोलिसांनी भा.न्याय संहिता कलम 85, 115, 352, 351(2), 3(5) प्रमाणे गु.र.नं 5495/2026 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दि. 02/06/2026 रोजी 15.07 वा. गुन्हा नोंद झाला. पोसई येडे – 9763727522 तपास करीत आहेत.



