सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

अन्याग्रस्त शिक्षकांच्या आयुष्याचे सोने करण्याचे काम महासंघ करीत आहे

अक्कलकोट तालुका मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांचे प्रतिपादन

आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही; मात्र आमच्या महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघातील अन्याग्रस्त शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात सोने करण्याचे काम आम्ही यापूर्वी केलेले आहे आणि यापुढेही करीत राहणार, असे प्रतिपादन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने आयोजित केलेल्या अक्कलकोट तालुका मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी महासंघाचे राज्यसरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, राज्यउपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश शिंदे व रमेश लोखंडे, कोषाध्यक्ष नीलकंठ शिंगे, जिल्हा सचिव रवी देवकर, जिल्हा सहसचिव डॉ. राजदत्त रासोलगिकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर अन्यायग्रस्त शिक्षक व कर्मचारी यांनी आपला प्रश्न मांडला. याप्रसंगी राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश शिंदे व रमेश लोखंडे, रवी देवकर, दत्तात्रय शिंदे, राम गायकवाड, शिवाजी जगताप आदींनी अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका मनोगतात स्पष्ट केली.

या मेळाव्यात विश्वभूषण प्रशालेचे मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे आणि मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील कै.शहाजीराव पाटील विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक नागनाथ गायकवाड तसेच सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक मंडळाच्यावतीने गुरुनाथ कणगी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर सावकार कारंडे, तुकाराम दुपारगुडे यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार करण्यात आला.

या मेळाव्याचे प्रास्ताविक कोषाध्यक्ष नीलकंठ शिंगे यांनी केले. सूत्रसंचालन अक्कलकोट तालुका कोषाध्यक्ष जयदीप गायकवाड यांनी केले तर तुकाराम दुपारगुडे यांनी आभार मानले.

या मेळाव्यात अक्कलकोट तालुका सचिव सिद्राम मुली, संदीप निस्ताने, भोजराज गायकवाड, श्रीकांत चौधरी, जयदीप गायकवाड, राजेंद्र सरोटे, प्रा.अभिजीत भंडारे, सिद्धेश्वर भुरले, इन्नुस बाळगी, एकोराम चौगुले, शिवानंद चौगुले, भागवत देवकुळे यांचीही उपस्थिती होती.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी राहुल हिप्परगी, शामसुंदर गायकवाड, नितीन तळवार, संजय बनसोडे, सर्जेराव माशाळे, भाईदास कोकणी, मनीषा बाळकोटे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris