सोलापुरात हायटेंशन टॉवरवर व्यक्ती चढल्याने खळबळ; पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी..!

सोलापूर शहरातून एक धक्कादायक आणि तितकीच सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका उच्चदाब (High Tension) विजेच्या टॉवरवर एक वृद्ध व्यक्ती अचानक चढल्याचे दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्रचंड विद्युत प्रवाह असलेल्या उंच विजेच्या टॉवरवर व्यक्ती चढल्याचे पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून, संबंधित व्यक्ती नेमक्या कोणत्या कारणामुळे टॉवरवर चढली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. संबंधित व्यक्तीला सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
या थरारक घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या प्रयत्नांनंतर संबंधित व्यक्तीला सुखरूप खाली उतरवण्याचे आव्हान सध्या अग्निशामक दल आणि पोलिसांसमोर आहे..!



