सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर महानगरपालिकासोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

सोलापुरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश; छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडकडून मार्कंडेय रथयात्रेचे पुष्पवृष्टीने स्वागत…

सोलापूर : मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, सोलापूरच्या वतीने यंदाही मार्कंडेय रथयात्रेचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विजापूर वेस येथे रथयात्रेचे आगमन होताच रथावर पुष्पवृष्टी करून तसेच रथाला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या रथयात्रेच्या स्वागतासाठी विशेष उपस्थिती लावली. रथयात्रा विजापूर वेस परिसरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव करत रथयात्रेचे स्वागत केले. यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या कार्यक्रमात महापौर विनायक कोंडयाल, अध्यक्ष सुरेश फुलमामडी यांच्यासह रथयात्रेत सहभागी असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांना पुष्पहार अर्पण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सलोखा, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून सामाजिक एकोपा आणि सर्वधर्मीय सलोखा वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विविध समाजघटकांनी एकमेकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन परस्पर सन्मानाची भावना जोपासणे गरजेचे असल्याचा संदेशही या निमित्ताने देण्यात आला.

या स्वागत कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष म. शफीक रचभरे, माजी महापौर आरीफ शेख यांच्यासह राम गायकवाड, बशीर सय्यद, राजू हुंडेकरी, रिजवान शेख, रिजवान पैलवान, रिझवान दंडोती, तन्वीर गुलजार, कादर भागानगरी, रुस्तुम शेख, लक्ष्मण भोसले, तनवीर शेख, हारिस शेख, मुबीन शेख, बाबा शेख, सरफराज काझी, हुजेर बागवान, सैभोद्दिन मणियार, हारून शेख, काशीफ बेलीफ, इरफान बावा, मोहसीन शेख, शेरू उस्ताद आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्कंडेय रथयात्रेचे मुस्लिम ब्रिगेडकडून करण्यात आलेले स्वागत हे सोलापूर शहरातील सामाजिक सलोखा आणि परस्पर बंधुभावाचे उदाहरण ठरले. पुष्पवृष्टी आणि सत्काराच्या माध्यमातून रथयात्रेचे स्वागत करताना उपस्थितांनी एकतेचा आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश दिला.

या कार्यक्रमामुळे विजापूर वेस परिसरात काही काळ उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रथयात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी एकमेकांशी संवाद साधत सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला. सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये परस्पर सहभाग वाढवावा, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel