सोलापुरात क्रीडा हॉस्टेल उभारण्यासाठी प्रयत्नशील : उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर
समृद्धी स्पोर्टस क्लब कडून 50 राष्ट्रीय खेळाडूना ट्रॅकसूट वाटप:- सुजय(नाना) शिंदे

सोलापुरात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा आयोजन करण्यासाठी क्रीडा हॉस्टेलची गरज आहे. त्यासाठी सोलापूर महापालिकेमार्फत हॉस्टेल उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी दिले. व् समृद्धी कीडा सेवा पुरस्कारा बरोबर ५० राष्ट्रीय खेळाडूंना ट्रॅक सूट वाटप करणाऱ्या समृद्धी स्पोर्टस क्लबचे कार्य खूपच कौतुकास्पद आहे असे उदगार कार्यक्रम चे अध्यक्ष मा. सुजय(नाना) शिंदे काढले आहे असे समृद्धी स्पोर्टस क्लब चे संस्थापक संजय सावंत यांनी माहिती दिली.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सोलापूर अंतर्गत समृद्धी स्पोर्टस् क्लबच्या वतीने समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या.
याचाच धागा पकडून महापालिका क्रीडा अधिकारी नजीर शेख म्हणाले, क्रीडा होस्टेल उभारण्यासाठी महापालिकेमार्फत राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे यापूर्वी ८ कोटी ९२ लाखाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे दाखल केला आहे. तो प्रलंबित आहे, यासाठी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे सांगितले.
प्रत्येक वर्षी पुरस्काराच्या रकमेत एक हजाराची वाढ करणार : संजय सावंत
सोलापूर जिल्ह्यातील खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा संघटक यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येत असल्याचे समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक संजय सावंत यांनी यावेळी सांगितले. खेळाडूसाठी यंदा या पुरस्काराच्या रकमेत 1000 रुपयाची वाढ करण्यात आली असून प्रत्येक वर्षी एक हजाराची वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
शुटिंगबॉल बॉल मधे सोलापूर हे राज्यांच्या स्पर्धेत नेहमीच अग्रेसर:- निखील शेडगे
यंदाच्या या पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे. पुरुष व महिला खेळाडूंना प्रत्येकी 3100 रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल तर संघटक आणि प्रशिक्षक यांना मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल या पुरस्काराने गौरविण्यात आले. रामजी कश्यप (खो-खो)व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी (डायव्हिंग) या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना तर आंतरराष्ट्रीय डायव्हिंग प्रशिक्षक श्रीकांत शेटे व लॉन टेनिसचे आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटक राजीव देसाई यांना हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी राजीव देसाई यांनी समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या कार्यासाठी 5001 रुपयाची देणगी जाहीर केली.
हे पुरस्कार सांगली मार्केट कमिटी चे सभापती मा. सुजय( नाना) शिंदे महाराष्ट्र राज्य शुटिंग बॉल असोसिएशनचे सचिव निखिल शेडगे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महापालिका क्रीडा अधिकारी नजीर शेख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार बाळासाहेब काळे, शिक्षक नेते संजय चेळेकर,वीरभद्र यादवाड, नगरसेवक विनोद भोसले व सात्विक बडवे, अक्षय वाकसे, शैलेश राज,शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते अमजद जेलर, चंद्रकांत होळकर, समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष राजू प्याटी, उपाध्यक्ष अंबादास पांढरे,हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुदेश मालप, उद्योजक ज्योतिबा गुंड, ॲड बसवराज सलगर, समृद्धी बचत गटाचे अध्यक्ष अविनाश गोडसे,समृद्धी कला मंच अध्यक्ष कृष्णकांत चव्हाण, सेपक टकरा असोसिएशनचे सचिव रामचंद्र दत्तू, शुटिंग बॉल असो सचिव फैज अहमद बेगमपूरे, पुरस्कार निवड समितीचे सदस्य अजितकुमार संगवे, सत्येन जाधव व गणेश पवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे माजी सभापती संजय नाना शिंदे होते. यावेळी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू संध्याराणी बंडगर, डॉ. सातपुते, क्रीडा शिक्षक मारुती घोडके व सोनाली भोसले यांना समृद्धी क्लबचे सदस्यत्व देण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार अजितकुमार संगवे,अमीर काझी, रेणुका बुधराम, पुंडलिक कलखांबकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समृद्धी स्पोर्टस क्लबचे उपाध्यक्ष प्राचार्य अंबादास पांढरे यांनी केले. तुळजापूर तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार यांनी सूत्रसंचालन तर आभार मल्हारी बनसोडे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी.डी. राठोड, शोएब बेगमपूरे, सुरेश भोसले, संतोष जाधव,पुंडलिक कलखांबकर, गणेश कुडले, श्रीमंत कोळी, शाहनवाज मुल्ला, शिवाजी वसपटे, प्रमोद कुरकुळळी, व्यंकाप्पा शेंडगे, संजय बनसोडे,हिरा पवार यांनी विशेष प्रयत्न केले.



