सोलापूर – कुमठा नाक्यातून स्प्लेंडर बाईक लंपास; MIDC पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा!

सोलापूर – कुमठा नाका परिसरातून भरदिवसा राहत्या घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लबाडीने पळवल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८७३/२०२६ भा.न्या.संहिता कलम ३०३(२) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
घटना – दि. ३०/०९/२०२६ रोजी सकाळी ८.०० ते ९.०० वा. दरम्यान, कुमठा नाका, सोलापूर
तक्रार – दि. ३०/०९/२०२६ रोजी रात्री १०.४७ वा.
फिर्यादी – सागर सुनिल बंडगर, रा. १६६, कुमठा नाका, सोलापूर
चोरीस गेलेला माल – ३०,०००/- रु. किमतीची निळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. MH १३ AS २६८८
हकीकत अशी की, फिर्यादीची वरील वर्णनाची व किमतीची मोटरसायकल राहत्या घरासमोर लावली असताना, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे.
भर वस्तीतून बाईक चोरीला गेल्याने परिसरात चोरट्यांची दहशत वाढली असून, पुढील तपास पोहे.कॉ. ६२५ उबाळे हे करीत आहेत.



