सोलापूर बातमीsolapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर अपघातसोलापूर क्राईम

सोलापूरातील रस्त्यात अचानक कार मागे घेतली, दुचाकीस्वाराला उडवले; कारचालक फरार!

सोलापूर – शेळगी ब्रिजवर बेदरकारपणे कार चालवत भररस्त्यात अचानक कार थांबवून मागे घेतल्याने दुचाकीस्वाराला जोराची धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

याप्रकरणी *जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७५४/२०२६ भा न्याय सं कलम २८१, १२५(अ)(ब), मोवाकाक १८४, १३४, १७७ प्रमाणे* गुन्हा दाखल झाला आहे.

घटना – दि. २९/०९/२०२६ रोजी दुपारी १३.१० वा. चे सुमारास, शेळगी ब्रिजवर, सोलापूर

तक्रार – दि. ०१/१०/२०२६ रोजी रात्री ११.२६ वा.

फिर्यादी – आकाश शंकर केगनाळकर, रा. निलम नगर, सोलापूर

आरोपी – कार क्र. MH २७ EC ९७४२ चा अज्ञात चालक

हकीकत अशी की, फिर्यादी हे त्यांची बजाज पल्सर दुचाकी क्र. MH १३ EL २३२८ वरून जात असताना पुढे असणाऱ्या आरोपीत वाहन चालकाने त्याचे ताब्यातील कार हयगयीने, निष्काळजीपणे चालवून अचानक थांबवून मागे घेतल्याने फिर्यादीच्या दुचाकीला जोराचा धक्का बसला. या धडकेत फिर्यादी रोडवर पडून गंभीर जखमी झाले.

जखमी अवस्थेत फिर्यादी रस्त्यावर पडलेला असतानाही आरोपी तेथून तसाच निघून गेला आहे. जोडभावी पेठ पोलिसांनी आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास करीत आहेत..

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel