तरन्नूम बशीर नाईक याचं लग्न ठरलं , अन् आरोपी श्रीपाद याने अपहरण करून केलं खू-न !

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील शिवडाव-नाईकवाडीत थरकाप उडवणारी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. प्रेयसीचे लग्न ठरल्याच्या रागातून तिच्याच प्रियकराने तिचे अपहरण करून तिला दरीत ढकलून खून केल्याची कबुली दिली. मृत तरुणीचे नाव तरन्नुम बशीर नाईक असून ती इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. शुक्रवारपासून ती अचानक बेपत्ता झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता. या प्रकरणात तिचा प्रियकर श्रीपाद दिनकर वडर यानेच तिचे अपहरण करून खून केल्याचे भुदरगड पोलिसात कबुल केले.
क्रूरतेचा बळी ठरल्यामुळे हळहळ
तरन्नुमचे लग्न अन्यत्र ठरल्यामुळे आरोपी श्रीपाद वडरच्या मनात संताप होता. याच रागातून त्याने पूर्वनियोजित कट रचून तरन्नुमचे अपहरण केले. आरोपी तिला शिवडाव-नाईकवाडी येथील धोकादायक दरीकडे घेऊन गेला आणि तिथे त्याने तिला थेट दरीत ढकलून दिले. लग्नाच्या रागातूनच आपण हे टोकदार पाऊल उचलल्याची कबुली त्याने दिली आहे. भुदरगड पोलीस आणि साह्याद्री रेस्क्यू टीमच्या संयुक्त मोहिमेत दरीतून तरुणीचा मृतदेह बाहेर काढला. उच्चशिक्षित तरुणी अशा प्रकारे क्रूरतेचा बळी ठरल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.



