सोलापूर बातमीsolapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर अपघातसोलापूर क्राईम

सोलापूर ST स्टँडवर महिलेला कारने उडवले, चालक फरार..!

सोलापूर – शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सोलापूर एसटी स्टँड परिसरात एका बेदरकार कार चालकाने माणुसकीला काळीमा फासला आहे. पायी चालणाऱ्या महिलेला पाठीमागून जोरात धडक देऊन जखमी अवस्थेत रस्त्यावर सोडून कारसह पळ काढल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्ह्याचा तपशील :-
– पोलीस ठाणे : फौजदार चावडी पोलीस ठाणे
– गु.र.नं. व कलम : ७७२/२०२६ – भा. न्याय संहिता कलम २८१, १२५(अ) व मोटार वाहन कायदा १८४, १३४(अ)(ब)
– घटनेची वेळ व ठिकाण : दि. १६/१०/२०२६ रोजी सायं. ६.१५ वा. सोलापूर एसटी स्टँड
– गुन्हा दाखल वेळ : दि. १७/१०/२०२६ रोजी सायं. ५.५६ वा.
– फिर्यादी / जखमी : लक्ष्मी धम्मपाल कांबळे, वय ४३, रा. घर नं. ७५, गोकुळ नगर, जुळे सोलापूर
– आरोपी : कार क्र. MH १३ EZ ८२८२ चा अज्ञात चालक

नेमकी घटना काय घडली?

फिर्यादी लक्ष्मी कांबळे या बीएमआयटी कॉलेज सोलापूर येथील हॉटेलमध्ये काम करून एसटी स्टँड परिसरातून पायी घरी जात होत्या. त्या रस्त्याने चालत असताना त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या MH १३ EZ ८२८२ क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की महिला जागीच खाली कोसळली. त्यांच्या हातातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल हातातून लांबवर उडून कोठेतरी गहाळ झाला. या अपघातात त्यांच्या कंबरेला आणि मानेला जबर मुक्कामार लागला आहे.

सर्वात धक्कादायक म्हणजे, अपघात करूनही या मुजोर चालकाने गाडी थांबवून मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून भरधाव वेगात पळ काढला.

या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोहेकॉ/१४२२ डोबळे हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel