सोलापूर – लिव्ह-इन पार्टनरनेच घातला घात; महिलेच्या नावावरील जागा हडपली..!

सोलापूर, दि. ०१ सप्टेंबर -* लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकरानेच विश्वासघात करून प्रेयसीच्या नावावरील घरजागा बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात ४ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
*गुन्ह्याची माहिती -*
* *गु.र.नं. व कलम :* ७२७/२०२६ – भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३३५, ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३(५) प्रमाणे
* *घटनेची वेळ व ठिकाण :* दि. २१/०६/२०२६ रोजी सकाळी ११.०० वा. सह दुय्यम निबंधक कार्यालय, सोलापूर
* *गुन्हा दाखल :* दि. ०१/०९/२०२६ रोजी सायंकाळी १८.४६ वा.
* *फिर्यादी :* रूपाली किसन पाटोळे, वय ३५ वर्षे, रा. २४८ बालाजी कॉलनी, बार्शी, सोलापूर
*आरोपी :*
१) किसन रंगनाथ पाटोळे
२) आकाश किसन पाटोळे
३) उत्तरेश्वर मारुती भालेराव
४) एक तोतया महिला (सर्व रा. मु.पो. तळे हिप्परगा, सोलापूर)
*नेमके काय घडले?*
फिर्यादी रूपाली पाटोळे यांनी त्यांच्या जागेच्या खरेदी दस्त क्र. ६६६७/२०१७ ची पाहणी केली असता धक्कादायक बाब समोर आली.
त्यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणारा आरोपी क्र. १ किसन पाटोळे यानेच त्यांच्या नावावरील जागा हडपण्याचा कट रचला. दि. २१ जून २०२६ रोजी खरेदी दस्त क्र. ५५०९/२०२६ अन्वये नोंद होऊन जागेची खरेदी करताना त्याने एका तोतया महिलेला (आरोपी क्र. ४) रूपाली पाटोळे म्हणून उभे केले.
आरोपींनी फिर्यादीचे आधारकार्ड बनावट सहीने तयार केले, तसेच खरेदी दस्तावर फिर्यादीचा फोटो लावून खोटी खरेदी-विक्री दाखवली. घरजागा मोकळी असल्याचे भासवून व्यवहाराची रक्कम १,९९,०००/- रु. रोख व २८,०००/- रु. विक्री करणाऱ्याच्या नावे दिल्याचे खोटे दस्तात नमूद केले.
या बनावट खरेदी व्यवहारावेळी साक्षीदार म्हणून आरोपी क्र. २ आकाश पाटोळे आणि आरोपी क्र. ३ उत्तरेश्वर भालेराव यांनी सह्या केल्या.
हा सर्व प्रकार बनावट असल्याचे लक्षात येताच रूपाली पाटोळे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास करीत आहेत…



