महाराष्ट्र

टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूची ‘लुका-छुपी’, गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडीओ झाला व्हायरल

आज भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात विश्वचषकाच्या (World Cup 2023) मेगाफायनलचा मेगामुकाबला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे लागलं आहे.

दरम्यान, एकीकडे विश्वचषकाचा माहौल पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे टीम इंडियाचा खेळाडू श्रेयस अय्यर सध्या चर्चेत आला आहे. श्रेयस अय्यर ‘मिस्ट्री गर्ल’मुळे चर्चेत आला आहे. ही मुलगी श्रेयस अय्यरची गर्लफ्रेंड असल्याचं बोललं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे श्रेयस अय्यर टीम इंडियाच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये या कथित गर्लफ्रेंडसोबत सामील झाला होता, अशी माहिती समोर आली आहे.

श्रेयस अय्यरसोबतची मिस्ट्री गर्ल कोण?

श्रेयस अय्यर भारतीय क्रिकेट संघाच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये एका तरुणीसोबत दिसला. ही तरुणी श्रेयस अय्यरची गर्लफ्रेंड असून तो मागील काही काळापासून या तरुणीला डेट करत असल्याचं सांगितलं जात आहे. टीम इंडियाच्या दिवाळी पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटो आणि व्हिडीओमध्ये दोघेही मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसत आहेत.

 

दिवाळी पार्टीतील व्हिडीओ व्हायरल

श्रेयस अय्यरसोबत ज्या तरुणीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत, त्या तरुणीचं नाव त्रिशा कुलकर्णी असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावरील श्रेयस अय्यर संबंधित अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर श्रेयस अय्यर आणि त्रिशा कुलकर्णी यांचे काही जुने फोटो देखील समोर आले आहे. एका फोटोमध्ये श्रेयस आणि त्रिशा शार्दुल ठाकूरसोबत डिनर करताना दिसत आहेत. त्यामुळे श्रेयस आणि त्रिशाच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं आहे.

 

त्रिशा कुलकर्णी लाइमलाइटपासून दूर राहते. इंस्टाग्रामवर त्याचे खाते खाजगी आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याबद्दल फारशी माहिती मिळू शकली नाही पण हे कपल रिलेशनशिपमध्ये असल्याचे मानले जात आहे. श्रेयस अय्यर त्रिशाला सोशल फॉलो करतो, त्यासोबतच अय्यरची बहीण श्रेष्ठही त्रिशाला फॉलो करते.

अलीकडे त्रिशाही स्टेडियममध्ये दिसली आहे. एका फोटो ती टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिकासोबत बसलेली दिसत आहे. आता श्रेयस त्रिशाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम कधी देणार हे पाहावं लागणार आहे.

Author : एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel