महाराष्ट्र

पुण्यातील सूस खिंडीत भीषण अपघात:दोन मालवाहू ट्रकच्या धडकेत दोघे गंभीर जखमी

पुणे शहरात मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर पाषाण परिसरात सूस खिंडीत दोन मालवाहू ट्रकचा अपघात रविवारी सकाळी झाला. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. तर ट्रकमध्ये अडकलेल्या दोघांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली आहे.

या बाह्यवळण मार्गावर सूस खिंड परिसरात महिंद्रा शोरुमजवळ रस्त्याच्या कडेला रविवारी पहाटे एक ट्रक थांबला होता. त्यावेळी भरधाव वेगाने साताऱ्याकडे निघालेला ट्रक थांबलेल्या ट्रकवर पाठीमागून जोरात आदळला.

यावेळी ट्रकमधील केबिनमध्ये चालक आणि त्याचा सहकारी अडकले. या अपघाताची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पाषाण केंद्रातील जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. अपघातात ट्रकच्या केबीनचे बरेच नुकसान झाले होते.

केबीनचा काही भाग कटर यंत्राने कापून जवानांनी दत्तू अंबू गोळे (वय ६०) आणि सूरज सुर्वे (वय ३०) यांची सुखरुप सुटका केली. त्यांच्या पायला दुखापत झाली होती. गोळे आणि सुर्वे मूळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अग्निशमन अधिकारी शिवाजी मेमाणे, लतेश चौधरी, विष्णू राऊत, ज्ञानदेव गोडे, अब्दुल पटेल, सुरेश इष्टे, ओंकार देशमुख, विकास कुटे आदी या मदतकार्यात सहभागी झाले होते.

ऑनलाइन तीन लाख रुपयांचा गंडा

आंबेगाव बुद्रक येथे राहणाऱ्या राजन सदाशिव वनशिव (वय-४८) यांनी माेबाईलवर आलेली एक लिंक ओपन केली असता त्यांचे बँक खात्याची माहिती अज्ञात आराेपीने चाेरुन त्यांचे खात्यातून परस्पर दाेन लाख ८९ हजार रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार समाेर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार राजन वनशिव यांनी कस्टमर स्पाेर्ट पीएस. ऐपीके ही लिंक ओपन केली हाेती. त्यावेळी एका अनाेळखी माेबाईल धारकाशी त्यांनी काेणताही व्यवहार न करता, तसेच ओटीपी शेअर न करता तक्रारदार यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे डेबीट कार्ड त्यांच्या जवळ असताना ही त्यातून २४/२/२०२३ ते २६/२/२०२३ यादरम्यान एकूण दाेन लाख ८९ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणुक करण्यात आलेली आहे. याबाबत भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक (गुन्हे) एस पुराणिक पुढील तपास करत आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)