सोलापूर बातमीदेश - विदेशमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

भारत-अमेरिका व्यापार करार रद्द करा- सोलापूर युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी यांना निवेदन…

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष यांच्या सुचनेनुसार केंद्र सरकारने प्रस्तावित केलेला ‘भारत-अमेरिका व्यापार करार’ (US-India Trade Deal) शेतकरी,ग्रामीण अर्थव्यवस्था व अन्नसुरक्षेसाठी घातक ठरणार असल्याचा आरोप करत सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांना जिल्हाधिकारी,सोलापूर यांना निवेदन दिले.

हा करार केवळ एक आर्थिक तडजोड नसून, तो देशातील शेतकरी, आपली ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देशाच्या अन्नसुरक्षेवर घाला घालणारा एक मोठा धोका आहे. या करारानुसार अमेरिकेतील कृषी उत्पादनांवर शून्य टक्के आयात शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, अमेरिकेतील स्वस्त कृषी उत्पादने भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर येतील. याचा थेट फटका भारतातील स्थानिक शेतकऱ्यांना बसणार आहे.तसेच या करारामुळे कृषी उत्पादन बाजार समिती व्यवस्था व MSP (किमान पायाभूत किंमत)यांची उपयुक्तता कमी होईल.स्थानिक शेतकर्‍यांकडून खरेदी करण्या ऐवजी आयात केलेल्या उत्पादनांना प्राधान्य देतील.ज्यामुळे स्थानिक बाजारपेठेचे अस्तित्व धोक्यात येईल

दुग्धव्यवसायावरही या कराराचा गंभीर परिणाम होणार आहे.स्वस्त आयातातील दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ मुळे गावपातळीवरील दुध उत्पादकांचे उत्पन्न कोसळेल व आर्थिक अर्थ व्यवस्था डगमगेल.या करारामुळे कृषी क्षेत्रावर मोठ्या खाजगी कंपन्यांचे वर्चस्व निर्माण होण्याचा धोका आहे.ज्यामुळे भारतीय शेतकरी स्वतःच्या जमिनीवर मजूर बनण्याची वेळ येऊ शकते.हा करार शेतकरी विरोधी असून देशाच्या आत्मनिर्भरतेस बाधा आणणारा आहे.तरी भारत अमेरिका व्यापार करार रद्द व्हावा.

यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे,उत्तर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे,विवेक इंगळे,धीरज खंदारे,सचिन पवार,दाऊद नदाफ,शशिकांत शेळके,आकाश जांभळे,महेंद्र शिंदे,अस्लम शेख,आकाश नाईक,अभिषेक पाटोळे,अजय रणदिवे,युवराज दोडमनी आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia