सोलापूर राजकीयसोलापूर धार्मिकसोलापूर सामाजिक

सोलापूरात हिंदू आक्रोश सभा… कधी, कोठे पहा ..

सोलापुरात सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा २४ सप्टेंबरला

सोलापूर – सकल हिंदू समाजाच्या वतीने येत्या २४ सप्टेंबर, बुधवार रोजी सोलापुरात एक भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा दुपारी साडेचार वाजता निघणार असून, मल्लिकार्जुन मंदिर बाडीबेस येथून सुरुवात करून टिळक चौक – कन्ना चौक मार्गे जाणार आहे. या मोर्चाचा समारोप कन्ना चौक येथे होणार असून, तेथे मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेचा विषय विशेषतः महत्त्वाचा मानला जात आहे. हिंदू समाजाचे उत्सव साजरे करताना प्रशासनाकडून लादली जाणारी बंधने आणि त्याउलट मशिदींवरील भोंग्यांच्या संरक्षणाबाबत घेतली जाणारी दुप्पटी भूमिका, या मुद्द्यांवर सकल हिंदू समाजाने संताप व्यक्त केला आहे. याच निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

आयोजकांच्या मते, “हिंदू समाजाच्या धार्मिक परंपरा, उत्सव आणि सण-वारांवर अन्यायकारक बंधने घालण्यात येतात. मात्र दुसरीकडे मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात प्रशासन वेगळीच भूमिका घेताना दिसते. या दुटप्पी धोरणाला विरोध करण्यासाठी आणि हिंदू समाजाची भूमिका ठामपणे मांडण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.” प्रमुख वक्ते म्हणून आमदार गोपीचंद पराडकर आमदार सचिन कल्याणशेट्टी भाजप नेते किरीट सोमय्या आदी उपस्थित राहणार आहे

सोलापूर शहरात यापूर्वीही विविध धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी यासंदर्भात आंदोलने केली आहेत. मात्र या वेळी “सकल हिंदू समाज” या व्यासपीठावरून विविध संघटना, कार्यकर्ते आणि समाजबांधव एकत्र येणार असल्यामुळे हा मोर्चा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, शहर पोलिस प्रशासनाकडून मोर्च्याला आवश्यक ती परवानगी व सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार असल्याचे समजते. मोर्च्यामुळे शहरातील काही मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

सोलापुरकरांचे लक्ष आता या मोर्च्याकडे लागले असून, २४ सप्टेंबर रोजी कन्ना चौकातील सभा कशी पार पडते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login