देश - विदेशन्यायालय निर्णयराजकीयसोलापूर बातमी

सोलापूर: भाजप आ. सुभाष देशमुखांचे चिरंजीव रोहन देशमुखांच्या परदेशी दौऱ्याला कोर्टाने दिली परवानगी

सोलापूर:भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन सुभाष देशमुख हे कुटुंबासोबत परदेशात जाणार आहेत.मात्र कोर्टात त्यांच्यावर खटला प्रलंबित असल्याने सोलापूर न्यायालयाची रितसर परवानगी घेणे बंधनकारक होते.रोहन देशमुख यांनी आपल्या वकिलामार्फत सोलापूर न्यायालयात परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी रीतसर परवानगी मागितली आणि त्यावर सुनावणी झाली.प्रथम वर्ग न्यायधंडाधिकारी डी आर भोला यांनी दोन्ही बाजूच्या वकिलांचा म्हणणं ऐकून तीन लाख रुपयांची कॅश डिपॉझिट जमा करून रोहन सुभाष देशमुख यांना कुटुंबा सह दुबई,सिंगापूर,मालदीवला जाण्यासाठी परवानगी दिली आहे.

भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांच्या विरोधात रविराज सूर्यकांत कदम यांनी फिर्याद दिली होती.फिर्यादी वरून रोहन सुभाष देशमुख यांच्या विरोधात भा.द.वि.190,323,406,420,504 व 506 या कलमानुसार गुन्हे दाखल आहेत.त्यामुळे रोहन सुभाष देशमुख यांना परदेशी दौऱ्यावर जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक होती.त्यामुळे रोहन सुभाष देशमुख यांनी सोलापूर कोर्टात अर्ज केला आणि नियमानुसार परवानगी मागितली .तीन लाख रुपयांच्या कॅश डिपॉझिटवर रोहन देशमुख यांना परदेशात जाण्यासाठी कोर्टाची परवानगी मिळाली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login