जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर

सुलेमान हम शर्मिंदा हैं तेरे कातिल जिंदा हैं!

जिल्हा जळगाव ता. जामनेर या ठिकाणी सुलेमान खान या युवकाची भाजप आणि गिरीश महाजन समर्थक शिवप्रतिष्ठानच्या दहशतवादी गुंडानी हत्या केली.
सुलेमान खानला बर्बर मारहाण केली त्याचे कपडे काढण्यात आले, पायाचे नख उपटले गेले. सरपंच संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारले तसेच सुलेमानला मारण्यात आले. हल्लेखोर भाजप आणि शिवप्रतिष्ठान या संघटनेशी संबंधित आहे. मुख्य आरोपी पवन बावस्कर व अन्य आरोपी अद्याप फरारी आहे याचा आका कोण? कुणाच्या इशाऱ्यावरून सुलेमान खानची हत्या झाली. सुलेमान खान यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना एका निरपराध मुस्लिम तरुणाचा जीव घेण्यासाठी कुणी प्रोत्साहित केले या सर्व बाबींचा खुलासा होणे गरजेचे आहे.

गेल्या 2023 पासून आमदार गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी शिवप्रतिष्ठानचे मनोहर भिडे यांचे अनेक कार्यक्रम घेऊन जामनेर या ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण केला होता. त्याचाच परिणाम असा झालं की दोन दिवसांपूर्वी सुलेमान खानची हत्या झाली हाल हाल करून मारण्यात आले. गिरीश महाजन यांच्या घरासमोर असलेल्या काफेमध्ये पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी बसला होता. काफे चालकाच्या मालकांनी सुलेमान खानच्या मारेकऱ्यांना तुरंत फोन लावून सांगितले की या ठिकाणी एक मुस्लिम मुलगा हिंदू मुली सोबत काफेमध्ये बसला आहे. अशी माहिती दिली. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक पवन बावस्कर व त्याचे काही साथीदार तिथे आले आणि सुलेमान खान या तरुण 20 वर्षाच्या मुलाला जबर मारहाण करून तथाकथित लव जिहाद खोटा आरोप लावून त्याची हत्या केली. सदरची हत्या हे माणुसकीला काळीमा फासणारी असून सदर घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. सुलेमान खानच्या हत्यातील सर्व आरोपींना ताबडतोब अटक करून कठोर शिक्षा व्हावी याकरिता आज पुणे कलेक्टर ऑफिस या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार व मास मोमेंट संघटनाचे भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सिंधुताई शेलार, बहुजन समाज पक्षाचे नेते दिलीप कुसाळे, एडवोकेट समीर शेख, ख्रिश्चन महासंघचे अध्यक्ष राजन नायर, दीपा विलियम, इंदुताई कुचीकर, इब्राहिम खान, जावेद शेख, नूर शेख, अब्दुल बागवान, असलम सय्यद, फिरोज मुल्ला, सलीम मौला पटेल, महबूब शेख, अखिल शेख, जुबेर बाबू शेख, सुलतान शहा, इब्राहिम यवतमाळवाला, सलीम शेख, मोईन शेख, अजीम बाबुमिया शेख, वाहिद बियाबानी इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी पुणे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र दुडी यांना निवेदन देण्यात आले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia