सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

सोलापुरात सर्वधर्म एकता मंचाचे पोलीस आयुक्तांना निवेदन; नाझिया इलाही खान यांच्यावर कारवाईची मागणी…

सोलापूर : सर्वधर्म एकता मंच, सोलापूरच्या वतीने पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना निवेदन देऊन नाझिया इलाही खान यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) व माँ आयेशा यांच्याविषयी कथितरीत्या केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
1)निवेदनात संबंधित व्हिडिओची सत्यता आणि फॉरेन्सिक पडताळणी करण्यात यावी,
2)प्रथमदर्शनी गुन्हा आढळल्यास भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत तात्काळ एफआयआर नोंदवावा,
3)प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक व जलद तपास करावा तसेच समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी दासजी शेळके (मराठा समाज), विजयकुमार हत्तुरे (लिंगायत समाज), संजय बाबा शिंदे (चर्मकार समाज), शंकर चौगुले (वडार समाज), गणेश कोळी (कोळी समाज), आनंद चंदनशिवे (बौद्ध समाज), देवेंद्र भंडारे (मोची समाज), अनिल वसाम (पद्मशाली समाज), अजित कुलकर्णी (ब्राह्मण समाज), युवराज राठोड (बंजारा समाज), राज सलगर (धनगर समाज), श्याम धुरी (बिडर समाज), पोपटसिंग टाका (शीख समाज), पराग शहा (जैन समाज), विलास कटक-दौंड (ढोर समाज), मुन्नू सिंग बाबावाले (लोधी समाज), तुषार खंदारे (मातंग समाज), नागेश गायकवाड (कैकाडी समाज), रसूल पठाण व फारुख शेख (मुस्लिम समाज)शकलेश बाबळगावकर इम्रान मंगलगिरी रविराज फास्टर जैकी पठान अरमान शेख यांच्यासह विविध समाजांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी सर्वधर्म एकता मंचाचे संस्थापक अध्यक्ष रसूल पठाण यांनी, “प्रेषित मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी केली….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia