माहेरहून १० लाख आण म्हणून विवाहितेचा छळ! निर्मिती विहारमध्ये पतीसह सासू-सासऱ्याचा जाच; सात जणांवर गुन्हा!

सोलापूर – शेअर मार्केट व ट्रेडिंग करायचे आहे, त्यासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची संतापजनक घटना निर्मिती विहारमध्ये घडली आहे.
याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५५४/२०२६ भा.द.वि. ४९८(अ),५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
घटना – दि. ०३/०८/२०२२ ते दि. ०५/०१/२०२४ चे दरम्यान, निर्मिती विहार, सोलापूर
तक्रार – दि. ०३/१०/२०२६ रोजी १९.०९ वा.
फिर्यादी – ऋतुजा चेतन वाळके, वय- २७ वर्षे, रा. व्यंकटेश नगर, नळदुर्ग, जि. धाराशिव
आरोपी – १) चेतन- पती, २) चंद्रकांत- सासरे, ३) रजनी- सासू, सर्व रा. निर्मिती विहार, सोलापूर ४) प्रभावती, ५) शंकर बेडमंडारे, ६) रितेश कोन्हेरीकर, ७) मेधमाला कोन्हेरीकर, रा. कुमठा नाका, सोलापूर
हकीकत अशी की, वरील वेळी व ठिकाणी, नमुद आरोपीतांनी संगनमत करून फिर्यादीस शेअर मार्केट व ट्रेडिंग करता १० लाख रुपये माहेरून आण म्हणून तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ केला आहे.
लग्नानंतर दोन वर्षे सतत पैशासाठी छळ होत असल्याने अखेर पीडित विवाहितेने पोलिसात धाव घेतली आहे. पुढील तपास सफौ- राठोड- ९०७५४६८१८६ हे करीत आहेत.



