सोलापुरात साजिद शेख यांची, भरदिवसा सुजुकी बर्गमन चोरी, गुन्हा दाखल !

सोलापूर (प्रतिनिधी) – शहरातील लष्कर परिसरातून पांढऱ्या रंगाची सुजुकी बर्गमन दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. हँडल लॉक करून ठेवलेली गाडी चोरट्याने लबाडीने चोरून नेली असून सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस ठाणे – सदर बझार पोलीस ठाणे
गुन्हा क्रमांक – ८५२/२०२६ – BNS कलम ३०३(२) प्रमाणे
घटनेची वेळ व ठिकाण – दि. ०२/१०/२०२६ रोजी १८.०० वा. च्या सुमारास, लष्कर, सोलापूर
गुन्हा दाखल – दि. ०६/१०/२०२६ रोजी १३.४४ वा.
फिर्यादी – साजीद जिलानी शेख, रा. शिवगंगा नगर, सोलापूर
आरोपी – अज्ञात चोरटा
गेलेला माल – २५,०००/- रु. किमतीची पांढऱ्या रंगाची सुजुकी बर्गमन मो.सायकल क्र. MH 13 EQ 9046
हकीकत अशी की,
फिर्यादी यांनी त्यांची सुजुकी बर्गमन मो.सायकल क्र. एमएच १३ ई क्यू ९०४६ ही लष्कर येथे हँडल लॉक करून लावली होती. त्याच दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या नकळत मुद्दाम लबाडीने ती दुचाकी चोरून नेली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोह/५५८/पकाले हे करीत आहेत.



