महान मानव मुक्तिदाता कॉ कार्ल मार्क्स यांच्या स्मृतिदिनी माकप कडून विनम्र अभिवादन!

कार्ल मार्क्स हे एक प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि क्रांतिकारी विचारवंत होते. ते समाजवाद आणि साम्यवादाच्या तत्त्वज्ञानाचे जनक मानले जातात. त्यांच्या विचारांनी जगभरातील अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळींवर मोठा प्रभाव टाकला. कार्ल मार्क्स यांचा १४ मार्च लंडन येथे १८८३ रोजी झाला. मार्क्स यांना हायगेट स्मशानभूमी लंडन येथे दफन करण्यात आले. त्यांच्या समाधीवर “Workers of all lands, unite!” (सर्व देशांतील कामगारांनो, एक व्हा!) हा प्रसिद्ध घोषवाक्य कोरलेला आहे. ही प्रेरणा घेऊन जगभर कामगार चळवळीला गती प्राप्त झाली. मार्क्स यांनी “द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो” (1848) आणि “दास कॅपिटल” (1867) यासारखी महत्त्वाची ग्रंथरचना केली. त्यांच्या विचारांवर आधारित मार्क्सवाद (Marxism) या विचारसरणीने अनेक क्रांतींना आणि कामगार चळवळींना प्रेरणा दिली.अशा शब्दांत माकपचे राज्य समिती सदस्य कॉ ॲड.अनिल वासम यांनी अभिवादन केले.
शुक्रवार दिनांक 14 मार्च रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे कॉ.विजय हरसूरे व कॉ अनिल वासम यांच्या हस्ते कॉ कार्ल मार्क्स यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲड एम एच शेख यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, कार्ल मार्क्स यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या विचारांनी रशियन क्रांती (1917), चीनमधील समाजवादी चळवळ आणि जगभरातील डाव्या विचारसरणीच्या चळवळींवर मोठा प्रभाव पाडला. आजही त्यांचे विचार अर्थशास्त्र, राजकारण आणि समाजशास्त्राच्या अभ्यासात महत्त्वाचे मानले जातात.
यावेळी पक्षाचे जिल्हा समिती सदस्य कॉ दीपक निकंबे,विरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ, पांडुरंग म्हेत्रे, तबसुम शेख, अभिजीत निकंबे, प्रकाश कुऱ्हाडकर, शिवा श्रीराम, युसुफ शेख, ओंकार संजीव, मल्लिकार्जुन बेलियार आदींची उपस्थिती होती.



