सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

मराठी भाषेसोबत जातीचा मुद्दा समोर आला;आर टी ओ कार्यालयात रिक्षा चालकांचा धरणे

मराठी मुस्लिम संतापले;फक्त मुसलमानाना मराठी सक्तीचा कायदा नको

सोलापूर: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व रिक्षा चालक, टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्ती केली आहे.16 ऑगस्ट पासून याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. सोलापुरातील आर टी ओ कार्यालयात मंगळवारी दुपारी मराठी भाषेबाबत कार्यशाळा संपन्न झाली. या मध्ये सोलापुरातील रिक्षा चालक सहभागी झाले होते. कार्यक्रमात डॉ ज्योती ठाकरे यांनी बोलताना सांगितले, मुस्लिम समाजातील असेल तर त्याला मराठी भाषा प्रमाणपत्र द्यावे लागेल. डॉ ज्योती ठाकरे यांच्या वक्तव्याने मराठी बोलणारे मुस्लिम रिक्षा चालक, आणि टॅक्सी चालक संतापले आहेत. बुधवारी दुपारी सर्व रिक्षा चालक संघटना एकत्रित येऊन आर टी ओ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जातीच्या आधारावर मराठी प्रमाणपत्र देऊ नका. जो खरच मराठी बोलतो, त्याला मराठी प्रमाणपत्र द्या. एखादा हिंदू असेल तर त्याला देखील मराठी भाषेच्या प्रमाणपत्रची सक्ती करा. अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यात तेलगू भाषिक, कन्नड भाषिक आहेत, पण ते हिंदू आहेत त्यांना मराठी भाषा प्रमाणपत्र सक्ती करणार नाही का असा सवाल रिक्षा चालकांनी उपस्थित केला आहे. एखादा मुस्लिम व्यक्ती त्याचा परिवार महाराष्ट्र राज्यात 50 वर्षापासून राहत असेल आणि, मराठी भाषा येत असेल, तरी त्याला मुस्लिम समाजाचा आहे म्हणून त्याला मराठी भाषेचा प्रमाणपत्र द्यायची सक्ती केली जात असेल तर खपवून घेतले जाणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया रिक्षा संघटनेच्या प्रतिक्रिया देण्यात आली….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia